
डॉ अनिल शिंदे यांची मध्यस्थी, लाभार्थ्यांना घरकुल देण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे…
अमळनेर:- गावात आवास योजनांच्या अंमलबजावणीसाठी नंदगाव येथील सरपंच व ग्रामस्थांच्या उपोषणात डॉ. अनिल शिंदे यांनी मध्यस्थी करत उपोषण सोडविले.
मोदी आवास योजना अंमलबजावणीकरिता प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून १ मार्च रोजी तालुक्यातील नंदगाव येथील लोकनियुक्त सरपंच दामोदर खैरनार व ग्रामस्थ पंचायत समितीच्या बाहेर आमरण उपोषणास बसले होते. सदर उपोषणाची बातमी काॅग्रेस पक्षाचे नेते डॉ अनिल शिंदे यांना कळताच डॉ शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन समस्या समजून घेत पंचायत समितीचे जवाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांच्याशी दुरध्वनीने संवाद साधत आंदोलनकर्त्या सोबत अधिकारी, यांची सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी नंदगाव येथील वंचित व पात्र लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेसह, शबरी घरकुल व रमाई आवास योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी विनंती डॉ अनिल शिंदे यांनी केली व पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी यांनी हि डाॅ शिंदे यांच्या सकारात्मक सुचनेनुसार सोमवारी लेखी पत्र व दिलेला शब्द पाळून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडविले. यावेळी काॅग्रेस पक्षाचे नेते डॉ अनिल शिंदे सोबत शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील, बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे अविनाश पवार, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अमोल भदाणे, कार्यालय अधिक्षक कैलास पाटिल, वरिष्ठ सहाय्यक जितेंद्र पवार, कनिष्ठ सहाय्यक अनिल पाटील, घरकुल विभागाचे कनिष्ठ सहाय्यक दिपक पाटील व इतर कर्मचारी हजर होते.




