
उपाध्यक्षपदी महेश नेरपगारे तर खजिनदारपदी सुशील भदाणे…
अमळनेर:- पू सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीत सहकार पॅनलने माऊली जय गजानन पॅनलवर विजय मिळवला आहे. चेअरमनपदी रमेश मांगु चव्हाण यांनी राजेंद्र श्रीराम पाटील यांचा पराभव केला.
सानेगुरुजी पतपेढी च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, खजिनदार पदांसाठी निवडसभा २९ रोजी सकाळी ११ वाजता पतपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. उपाध्यक्ष पदासाठी महेश नेरपगारे यांनी प्रतिभा जाधव यांचा पराभव केला. मानद सचिव पदासाठी प्रा मंदाकिनी भामरे यांनी आशिष शिंदे यांचा पराभव केला. तर खजिनदार पदासाठी सुशील भदाणे यांनी प्रमोद पाटील यांचा पराभव केला. यावेळी संचालक संजीव पाटील, सविता बोरसे हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले. त्यांना व्यवस्थापक सागर पाटील, अजय पाटील यांनी सहकार्य केले. पतपेढीच्या सर्व पदांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने पॅनल प्रमुख तुषार बोरसे, सिनेट सदस्य अनिकेत पाटील, प्राचार्य पी एम कोळी, मिलिंद बोरसे, श्रीकांत पाटील, महेंद्र बोरसे, संजय पाटील, आर बी पाटील, जे डी अहिरे,जितेंद्र ठाकूर,श्रीनाथ पाटील, साखरलाल महाजन, महेंद्र रामोसे, समाधान पाटील यांनी अभिनंदन केले आहे.




