
अमळनेर:- स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.)येथे समाजाचे आपणही काही देणे लागतो या उदांत हेतूने एक आगळावेगळा असा “समर्पण सप्ताह कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम दिवाळीच्या सुट्टीमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना खरी कमाई नावाचे परिपत्रक देण्यात आले होते.त्यात विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार कामाची यादी व कामास्वरूप तेवढी रक्कम नमूद केली होती.त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे सुट्टींमध्ये काम केले व पालकांनीही कामाच्या मोबदल्यात आपल्या पाल्यांना पैसे दिले सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जवळील जमापुंजी वर्गशिक्षकेजवळ जमा केली व आपण या पैशांची नेमके काय करणार आहोत? याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन मुख्याध्यापकांशी सल्ला मसलत करून अगदी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या नावाची यादी तयार करण्यात आली तेव्हा विद्यार्थ्यांनी जमापुंजी केलेली रक्कम व त्यात शाळेची रक्कम मिळून शालोपयोगी असा संच तयार करण्यात आला. त्यात पुस्तक वही पेन पेन्सिल रबर शॉपनर, स्केचपेन इत्यादी वस्तूंचा समावेश होता त्यानंतर तो संच “समर्पण सप्ताह” या कार्यक्रमांतर्गत भेट दिलेल्या शाळांमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलविण्यात आले व “खरी कमाई या उपक्रमांतर्गत जमापुंजी केलेले विद्यार्थ्यांच्या हस्ते त्या मुलांना हा संच देण्यात आला. आलेल्या विद्यार्थ्यांविषयीची शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूतीची प्रेम करुणा वासल्याची ,भावना दिसून दिसून आल्या.या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू म्हणजे समाजाचे आपणही काही देणे लागतो हा उदांत हेतू लक्षात घेऊन “समर्पण सप्ताह” हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला. “समर्पण सप्ताह हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर व शालेय समिती सदस्य सितीका अग्रवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.




