
अमळनेर :- येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १५९ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून सुमारे चार कोटी १३ लाख ५२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दि.३ मार्च रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.त्यात प्रलंबित खटल्याचे १ हजार ३२७ प्रकरणे लोक अदालत मध्ये दाखल करण्यात आले होते त्यातून ११३ खटले न्यायालयाने सोडविले असून त्यातून ३ कोटी ७८ लाख ६९ हजार ४६८ रुपयांची वसुली करण्यात आली. तर ३ हजार २२ वादपूर्व खटले लोक न्यायालयात दाखल करण्यात आले होते.त्यापैकी ४६ खटले निकाली काढण्यात आले असून त्यातून ३४ लाख ८२ हजार ५४४ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
सदर लोक अदालत मध्ये चार पॅनल करण्यात आले होते त्यात पॅनल एक चे पॅनल प्रमुख – एस.बी. गायधनी जिल्हा न्यायाधीश 1, अमळनेर पॅनल पंच – ऍड. किशोर डी. पाटील, पॅनल क्र 2 पॅनल प्रमुख – पी पी देशपांडे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अमळनेर पॅनल पंच – ऍड. अशपाक आय. सैय्यद पॅनल क्र 3 पॅनल प्रमुख – श्रीमती ए. यु. यादव 3रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर पॅनल पंच – ऍड. रोहित एम. ढिवरे, पॅनल क्र 4 पॅनल प्रमुख – श्रीमती एस. एस. जोंधळे 2 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर पॅनल पंच – ऍड. शुभांगी व्ही. निकम असे होते.
सदर लोक अदालत मध्ये वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ ऍड विलास डब्लु. वाणी, वकील संघाचे अध्यक्ष ऍड वाय. पी. पाटील, उपाध्यक्ष ऍड नंदलाल व्ही. सूर्यवंशी, सचिव ऍड जितेंद्र पी. साळी व सरकारी वकील किशोर बागुल, शशिकांत पाटील राजेन्द्र चौधरी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.




