
१५० विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळेची शैक्षणिक सहल संपन्न…
अमळनेर:- शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल शिर्डी येथे नुकतीच संपन्न झाली.
इयत्ता पाचवी ते सातवी च्या १५० विद्यार्थ्यांनी शिर्डी साई दर्शन, साईतीर्थ आणि वॉटर पार्क आदी ठिकाणी भेट दिली. साईतीर्थ मधील देशातील धार्मिक स्थळे आणि त्यांच्या प्रतिकृती पाहून सर्वच तीर्थांना भेटी दिल्याचे पुण्य विद्यार्थ्यांना लाभल्याचा भावना पालकांनी व्यक्त केल्या तर वॉटर पार्क मध्ये वेगवेगळ्या राईड्स चा खेळ खेळत विद्यार्थ्यांनी पाण्याचा आनंद लुटला, एस टी महामंडळाच्या तीन बसेस मंगळवारी पहाटे साडे पाच वाजता शिर्डी सहलीसाठी रवाना झाल्या होत्या, बुधवारी पहाटे 2 वाजता सहल सुखरूप परतली. मंगळवारी पहाटे संस्थेचे माजी चेअरमन गुणवंतराव पाटील, संचालक ऍड अशोक बाविस्कर, भास्कर बोरसे,किरण पाटील मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या उपस्थितीत सहल रवाना झाली होती. सहलीसाठी शिक्षक मनोज पाटील,योगेश मोरे,महेंद्र रामोशे, चिंतामण धमके, शिक्षिका हेमलता धाकड, योजना पाटील, उमेश पाटील, जितेंद्र वाणी, बापूराव ठाकरे,सोमेश्वर मलखेडे, मालती पवार, स्नेहल पाटील, पूजा सरनाईक यांनी मेहनत घेतली.




