महाशिवरात्रीपासुन पंधरा दिवस चालणारा खान्देशातील मोठा यात्रोत्सव…
अमळनेर:- पांझरा व तापीच्या संगमावर कपिलेश्वर मंदिर वसलेले असून वास्तुशील्प कलेमुळे हे मंदिर देशभर प्रख्यात आहे. हेमांडपंथीय कपिलेश्वर मंदिराचे बांधकाम १७ व्या शतकात पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. एका शिलालेखावर दादाजी नेवाडकर १६८८ शके नामसवंत्सर असा उल्लेख आहे. तर दुसऱ्या शिलालेखावर १७०५ ते १७०६ असा इसवी सनचा उल्लेख आहे. हे मंदिर उंच टेकडीवर असून तळाला तापी व पांझरा हा निसर्गाच्या अप्रतिम अविष्कार आहे.
मंदिरासमोरच्या सभामंडपात जाण्यासाठी तीन मार्ग आहे. प्रत्येक मार्गावर अर्धमंडप आहे. ते चौकोनी दगडी स्तंभावर आधाराने उभारलेले आहेत. दगडी स्तंभावर पानाफुलांचे उत्तम नक्षीकाम व मध्यभागी सभामंडप अशी विलोभनीय रचना आहे. सभामंडपाला १६ दगडी खांबांचा भक्कम असा आधार आहे. या सभामंडपात शिखर आहे. मंदिराच्या स्वयंभू शंकराच्या तीन पिंड आहेत. एक पुरातन आहे व ती पिंड स्वयंभू आहे. समोरच्या भिंतीलगत संगमरवरी दगडात कोरलेली उभी पार्वतीची मूर्ती आहे. पार्वतीच्या हाती गिरी आनंद म्हणजे गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या शिखरावर तपस्वी साधक आसरा सिंह, वाघ, हत्ती अशी शिल्पे साकारलेली आहे. नंदिचेही सुरेख शिल्प आहेत. कपिलमुनींनी एका झाडाखाली शिवपिंड मांडून योगसाधना कपिला नावाची गायही ह्या यागसाधनत सहभागी व्हायची म्हणून या मंदिराचे नाव कपिलेश्वर मंदिर पडले आहे. कपिलेश्वर मंदिर हे अमळनेर, शिरपूर या तीन तालुक्यांचा सिमेवर आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील महंत हंसानंदजी महाराज यांनी मंदिरात भेट देवून रामधुन या मंत्राचा जप सुरू करून भक्त परिवार निर्माण करून मंदिराचा परिसर सुशोभनीय केला आहे. भाविक भक्तांना राहण्यासाठी खोल्या श्रमदानातून उभारण्यात आल्या आहेत. वर्षापूर्वी साधुसंतांचा खूप मोठा असा कुंभमेळा भरला होता.
शंकराचार्यजींनी या कुंभमेळ्यात भाग घेतला होता. श्रावण महिन्यात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते व वर्षभर सोमवारी कालसर्प व विविध पुजा येथे होतात. मंदिराला तापी पुराचा नेहमी धोका असतो. म्हणून मंदिराच्या पुर्वेला संरक्षण भिंत बांधणीचे काम सुरू आहे. कपिलेश्वर मंदिर हे तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ व्हावे यासाठी परिसरातील लोक अनेक दिवसांपासून मागणी करत आहे. धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर खान्देश गंगा सुर्यकन्या तापी व पांझरा नदीच्या संगमावर दक्षिण तीरावर निर्जनस्थळी हजारो वर्षांची परंपरा असलेले पुरातनकालीन, जागृत व नवसाला पावणारे स्वयंभू त्रिपींडी श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेवाचा खान्देशातील मोठा १५ दिवसीय यात्रोत्सवला दि. ८ मार्च रोजी महाशिवरात्री पासुन सुरुवात होईल तर महाराष्ट्रात पहिले अखिल भारतीय संत संमेलन श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे पहिले अखिल भारतीय सत संमेलन श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज यांनी भरविल्या पासुन विविध धार्मिक विधीला येथे मान्यता मिळाल्या पासून खान्देश सह परप्रांतातून ही भाविक यात्रोत्सव काळात येऊन पितृशांती सह विविध तर्पण विधी व रात्री परिसरातील निरंकारी भजनी मंडळाकडून शिवरात्रीचा जागर महाशिवरात्री पर्वा निमित्त करतात. तसेच दुसर्या दिवशी आमावस्या असल्याने मांत्रिक- तांत्रिक रात्री तापी स्नान करतात व सवाद्य कपिलेश्वराचे दर्शन घेतात. महाशिवरात्री निमित्ताने मंदिर प्रशासन सोमवार पासून सज्ज झाले असून पार्किंग ,भक्त निवास, पाणीपुरवठा, नदीपात्रात दुर्घटना टाळण्यासाठी स्वयंसेवक, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात मग्न असल्याचे विश्वस्थ तुकाराम चौधरी यांनी देशदूतकडे सांगितले विविध धार्मिक ग्रंथात उल्लेख श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे पुरातन काळापासून तप, यज्ञकर्म, आदींची कपिलमुनींनी येथे सुरूवात करून काही काळ व योगसाधना केली त्या वेळी कपिला गाय येत असे त्यावरून शेकडा वर्षेपूर्वी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरातील त्रिपींडी महादेवाच्या मुर्त्याची स्थापना केल्याचा इतिहास शिलालेखावरून आढळतो. संस्कृत व मोडी लिपीत दिपमाला व मंदिराच्या तटरक्षक भिंतीवर लिहीलेले शिलालेख आज ही आहेत.
१७ व्या शतकात थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिललेखासह मंदिराच्या हेमांड पंथीय आकर्षक व विलोभनीय बांधकाम १६ व्या शतकात झाल्याचे शिलालेख येथे आज हि दिसतात. मंदिर पूर्ण काळ्या दगडांनी बांधले आहे तर १८ दगडी खांबावर मोठा सभामंडप व त्यावर तीन घुमट व एक मध्यभागी मुख्य घुमट असे पूर्वाभिमुख मंदिर आहे, तर दररोज सूर्यकिरण थेट त्रिपिंडीवर येऊन दर्शन घेतात हा विलक्षण क्षण काहीकाळच भक्तांना अनुभवता येतो, पायथ्याशी तापी व पांझरा नदीचे विहंगम सगमस्थळ त्यात दोन्ही बाजूला पाणी व २५ नौकातुन नौकानयनचा आनंद घेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा भागातुन भावीक दर्शनासाठी येतात मंदिर शेजारी अनिरुद्ध बापूचा आश्रम असल्याने भक्त परिवार मुंबई व बाहेर राज्यातून ही भाविक महाशिवरात्रीला कपिलेश्वर दर्शनासाठी येतात. २००५ साली अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते. अध्यात्म आणि सामाजिकता यातून परिसरात कायापालट झाला असून मंदिराला लागूनच अनिरुद्ध आश्रम आहे. याच ठिकाणी मठाधिपती हसानद महाराज यांनी लहान बालकांसाठी वेधशाळा सुरू केली असून शालेय शिक्षणाबरोबर त्यांना अध्यात्म ज्ञान दिले जात आहे. मंदिरावर वर्षभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात. तर महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो.
मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले आहे. यात्रोत्सव काळात अमळनेर आगारातून थेट कपिलेश्वर मंदिर पर्यत दररोज तासाला एक बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शिंदखेडा व शिरपुर येथुन ही पलीकडील मुडावद व भोरटेक पर्यंत बससेवा सुरू केली आहे. तसेच खाजगी वाहन ही मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता आहे. मारवड व बेटावद पोलीस आणि परिसरातील माध्यमिक विद्यालयातील स्काऊट गाईड, महिला स्वयंसेवक मदत करणार आहेत. सहा महिने पासून कपिलेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी वर्गणी गोळा करून संरक्षण भिंत व विविध विकासकामे करीत आहेत. कपिलेश्वर मंदिर हे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी नामदार अनिल पाटील सतत पाठपुरावा करीत आहेत.
२६ फूट उंच त्रिशूल आकर्षणाचे केंद्र…
तापी पांझरा पवित्र संगमावरील पुरातन श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानाला २६ फूट उंच व सहा किंटल वजनाचे त्रिशूल विधिवत मंत्रोच्चारात उभारण्यात आले यावेळी महामंडलेश्वर हंसानंदजी महाराज मंदिराचे विश्वस्त मंडळ व भाविक उपस्थित होते. म्हळसर ता शिंदखेडा येथील छायाचित्रकार महेश देविदास पाटील यांनी नेर कुसुबा येथील कारागिरकडून बनविले आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त…
यावर्षी मारवड पोस्टचे सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, पीएसआय विनोद पाटील, पीएसआय बाळकृष्ण शिंदे, फिरोज बागवान, सुनील तेली, सचिन निकम, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.