
दुसरा गंभीर जखमी,दहिवद निमझरी रस्त्यावरील घटना…
अमळनेर:- समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने निमझरी येथील एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना ७ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दहिवद निमझरी रस्त्यावर घडली.
सुनील नवल भिल व प्रवीण शंकर भिल हे दोघे मोटरसायकल एम एच १८ ,ए के १४७९ वर दहिवदकडे जाण्यासाठी निघाले असता सोनखेडी फाट्याजवळ शांताराम नीळकंठ पवार यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या बिना नंबरच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटरसायकल खाली पडून सुनील व प्रवीण दोघांच्या डोक्याला व दोन्ही पायांना जबर मार लागला. प्रवीण याने पडलेल्या अवस्थेत सुनील चे काका राजू वसंत भिल याना कळवले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी सुनीलला मृत घोषित केले. राजू भिल यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालकविरुद्ध मृत्यूस कारणीभूत आणि हयगय न करता वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




