
अमळनेर:- मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या मार्फत दि.8 मार्च रोजी “जागतिक महिला दिन ” निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.दिलीप कदम यांनी केले. यावेळी यांनी जागतिक महिला दिनचे महत्त्व विशद केले, सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मारवड गावच्या लोकनियुक्त सरपंच आशा भिल, सुभाष भिल हे होते. यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वरिष्ठ लिपिक मंजुषा गरुड यांचाही सत्कार करण्यात आला,सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. पाटील हे होते. जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणी पाटील, पुनम भिल या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केली. श्रीमती गरुड यांनी महिला दिनानिमित्त सर्व मुलींना शुभेच्छा दिल्या,यानंतर अध्यक्षीय मनोगतात प्रा. पाटील यांनी जागतिक महिला दिनाचा ऐतिहासिक आढावा घेतला, आणि भारतीय स्त्री कशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे, हे स्पष्ट करत या दिनाचे औचित्य स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमीन पठाण तर आभार कु. कोमल पाटील हिने मानले.




