
अमळनेर:- मेडिकल क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्वांचा सहभाग असलेली अमळनेर मेडिकोस बॉक्स क्रिकेट लीग ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
८ मार्चपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग नोंदविला. यावर्षी डेंटल असोसिएशन, अमळनेर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी ही स्पर्धा अयान मल्टीस्पोर्ट्सच्या ग्राउंडवर भरविण्यात येते. मेडिकल क्षेत्राशी निगडित असणारे सर्व घटक म्हणजे डॉक्टर्स, केमिस्ट, पॅथॉलॉजी, पीएचसी सेंटर या स्पर्धेत सहभाग नोंदवितात. या स्पर्धेचा अंतिम सामना अक्लॅप वॉरियर 1 आणि पीएचसी जानवे यांच्यात झाला. अतिशय चुरशीच्या सामन्यात अक्लॅप वॉरियर 1 संघ विजयी ठरला. सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार अनन्या जोशी हिने पटकावला. उत्कृष्ट गोलंदाज सीएम पाटील आणि जयप्रभा ओसवाल ठरले. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार अनन्या जोशी आणि शुभम सोनवणे यांना देण्यात आला. तर निलेश पाटील हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला.




