
अमळनेर:- इंदौर येथील “आपले वाचनालय व श्री सर्वात्तम संस्था यांच्यावतीने अमळनेर येथील कवी रमेश पवार यांच्या “गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ या काव्यसंग्रहास कविवर्य वसंत राशीनकर अ. भा. काव्य पुरस्कार इंदौर 2023” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
इंदौर येथे येत्या जून महिनात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येईल. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या अगोदर कवी रमेश पवार यांच्या ह्या काव्यसंग्रहास त्यांना यवतमाळ येथील “स्वा. लताताई रामटेके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर काव्यसंग्रह कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एमए मराठी प्रथम वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. अल्पावधीत वाचकप्रिय ठरलेल्या या काव्यसंग्रहा चा अहिराणी बोलीत डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी केला असून हिंदी अनुवाद प्रा.डॉ. सुरेश माहेश्वरी यांनी केला आहे. प्रा. प्रकाश धर्माधिकारी यांचे इंग्रजी अनुवादाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुरस्कासाठी कवी रमेश पवार यांचे डॉ. अविनाश जोशी, प्रा.डॉ. रमेश माने, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सोनवणे, श्यामकांत भदाणे, नरेंद्र निकुंभ, रणजीत शिंदे, प्रा.डॉ. लीलाधर पाटील, धनंजय सोनार, दिनेश नाईक, संदीप घोरपडे, प्रा. बराटे, सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, प्रा. श्याम पवार, भागवत गुरुजी, निरंजन पेंढारकर, डी. ए. धनगर, सुधाकर पवार तसेच आणि मराठी वाङ्मय मंडळ, पूज्य सानेगुरुजी वाचनालय, म सा प शाखा अमळनेर यांनी अभिनंदन केले आहे.




