
अमळनेर:- तालुक्यातील धानोरा येथे मौर्य क्रांती संघाची स्थापना करण्यात आली.अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत हे होते,तर फलकाचे उदघाटन जिल्हाध्यक्ष रविंद्र लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक एस.सी.तेले यांनी केले.यावेळी बन्सीलाल भागवत,रविंद्र लांडगे,गोपीचंद शिरसाठ,आर.सी.भालेराव,डी.ए.
धनगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निंबा कंखरे, पप्पू कंखरे, गुलाबराव भागवत, निलेश बागुल, दिलीप ठाकरे,नरेश न्ह्याळदे, हिम्मत ठाकरे,शालिग्राम ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मौर्य क्रांती संघाच्या शाखा प्रमुख पदी शांताराम ठाकरे तर कार्यकारणी सदस्य पदी तुषार ठाकरे, योगराज ठाकरे, अमृत रत्नपारखी, गोपीचंद ठाकरे ,निलेश ठाकरे, शंकर ठाकरे, प्रशांत ठाकरे, छबिलाल ठाकरे,पितांबर ठाकरे यांची निवड करण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.सी. तेले तर आभार वसंत शिरसाठ यांनी मानले.




