
आठ शेळ्या गंभीर भाजल्या, झाडी येथील घटना…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथे १५ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. त्यात १२ शेळ्यांचा जळून मृत्यू झाला तर आठ शेळ्या गंभीर भाजल्या आहेत.
शिवदास यादव भिल यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळताच त्यांनी अग्निशमन बंब पाठवला. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, आनंदा झिम्बल, तसेच गावकरी योगेश बागुल, शुभम भिल, अशोक पवार, विजय भिल यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तब्बल १२ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. शेळ्यांवरच उदरनिर्वाह असल्याने शिवदास भिल यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी भेटी दिल्या. पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिभा कोरे, विक्रांत पाटील यांनी जखमी बकऱ्यांवर उपचार केले. मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, तलाठी द्रौपदी पजई, स्वप्नील कुलकर्णी, तिलेश पवार, जितेंद्र पाटील यांनी पंचनामा केला. सुमारे दोन- अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात शेजारील गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी देखील भाजल्या आहेत. याबाबत मारवड पोलिस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




