
भाजपच्या विजय निर्धार मेळाव्यात आ. चव्हाण यांचा व्यक्त केला आत्मविश्वास…
अमळनेर:- जळगाव लोकसभा मतदार संघात संघटनेशी नाते असलेली महिला पहिल्यांदा खासदार होणार आहे. अमळनेर पेक्षा चाळीसगावचे मताधिक्य २० हजारांनी अधिक असेल, असा आत्मविश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी अमळनेर येथे भाजपच्या विजय निर्धार मेळाव्यात व्यक्त केला.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, स्व उदय वाघ यांच्या व स्मिता वाघांच्या परिश्रमाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सांगितले की, पक्षाने मला भरभरून दिले आहे. लोकसभेची उमेदवारी देण्यामागे मंगेश चव्हाण पडद्यामागचे सूत्रधार आहेत. मोदींनी केलेल्या विकास कामाचा पहाड भेदण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. यावेळी लोकसभा प्रभारी राधेश्याम चौधरी, श्याम अहिरे, ऍड व्ही आर पाटील, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर भैरवी पलांडे, भिकेश पाटील, बाजार समिती माजी सभापती प्रफुल्ल पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अर्बन बँक चेअरमन मोहन सातपुते, माधुरी पाटील,भारती सोनवणे, माजी जि प सदस्य मीनाताई पाटील, माजी सभापती रेखा पाटील, शहराध्यक्ष विजय पाटील, अजय केले, शीतल देशमुख, उमेश वाल्हे, राकेश पाटील, अजय केले, भरतसिंग पाटील, चंद्रकांत कंखरे, देवा लांडगे, बापू वाणी, स्वाती पाटील, अय्याज बागवान, राहुल बडगुजर, योगीराज पाटील, राहुल पाटील हजर होते. सुत्रसंचालन संदीप पाटील व महेंद्र पाटील यांनी केले.




