
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पाटील व सर्वज्ञ कार्डिओ केअर टीमचे यश…
अमळनेर:- हृदयरोग तज्ज्ञ डॉ. तुषार अर्जुन पाटील यांच्या धुळे येथील सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरमध्ये जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या सुखरूप पार पडली.
चोपडा येथील ७० वर्षीय रुग्णाच्या कमकुवत हृदयावरील अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची अशी ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लास्टी धुळे येथील सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरमध्ये सुखरूप पार पाडल्याने रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश प्राप्त झाले. सुरुवातीला रुग्णाच्या हृदयाचे पंपिंग खूप कमी असल्याने बायपास करणे शक्य नव्हते. ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी या शस्त्रक्रियेत हृदयातील रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे ब्लॉकेज मशीनच्या साहाय्याने फोडून रक्तवाहिन्यांना पूर्ववत केले जाते. डॉ. तुषार अर्जुन पाटील हे सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरचे डायरेक्टर असून केरळ युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडल पटकविणारे जिल्ह्यातील पहिलेच डॉक्टर आहेत. गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या अँजिओप्लेटी करण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांचे बंधू डॉ. घनशाम पाटील हे अमळनेर येथे सर्वज्ञ क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा करीत आहेत. डॉ. तुषार पाटील व टीमच्या यशस्वीतेबद्दल अमळनेर तालुक्यासह धुळे व जळगांव दोन्ही जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.




