
अमळनेर जागृत नागरिक मंचाच्या वतीने उपमुख्याधिकारी यांना निवेदन...
अमळनेर:- नगरपरिषदेकडून शहरातील नागरिकांची विविध कराच्या माध्यमातून होणारी छुपी लूट थांबवा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा अमळनेर जागृत नागरिक मंचाच्या वतीने देण्यात आला आहे.
अमळनेर नगरपरिषदेकडून सध्या वसुलीची धडक मोहीम सुरू असून त्यात थकीत रकमेवर २ टक्के व्याज, मालमत्ता कर व पाणी पट्टी यावर वार्षिक १२% व्याज, १० टक्के दंड व ४ टक्के नोटीस फी आकारण्यात येईल असा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांची छुपी लूट होत आहे. याबाबत मागील काळात आंदोलन करण्यात आल्याने त्यावर स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा अव्वाच्या सव्वा कर वसुली करण्यात येत असल्याने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आक्रमक भूमिका घेण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना जागृत नागरिक मंच यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी प्रवीण पाठक, शाम पाटील, संतोष पाटील, योगराज संदानशिव, पंकज चौधरी, अनिल महाजन, सचिन वाघ, अविनाश जाधव, दीपक चौगुले, कैलास पाटील, उज्वल मोरे, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, नरेश कांबळे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.




