शेतकऱ्याचे साठ हजाराचे नुकसान…
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे शिवारात शेतात आग लागून ठिबक नळ्या व साहित्य जळून शेतकऱ्याचे साठ हजाराचे नुकसान झाल्याची घटना दिनांक २० रोजी घडली आहे.
दीपक शालिग्राम पाटील यांचे एकलहरे शिवारात चार एकर शेत असून दिनांक २० रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांना मुलाचा फोन आला व त्याने शेतात आग लागल्याचे सांगितले. दीपक पाटील हे शेतात गेले असता शेतातील कापसाच्या काड्या, कोरडे गवत, ठिबक नळ्या आणि साहित्य जळून खाक झाले होते. त्यात शेतकऱ्याचे साठ हजाराचे नुकसान झाले असून मारवड पोलिसांत अकस्मात आग लागल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.