
आधी मुख्याधिकारी आता जिल्हा महिला बालविकास अधिकारी म्हणुन होणार रुजू
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी अर्चना संदीप राजपूत हिने प्रचंड मेहनतीच्या बळावर क्लास वनला गवसणी घातली असून आधी नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून तिने यश मिळविले असताना आता पुन्हा एमपीएससी मार्फत परीक्षा उत्तीर्ण झाल्याने जिल्हा महिला बालविकास अधिकारी म्हणुन तिची पदस्थापना होणार आहे.
विशेष म्हणजे मुख्याधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्चना नुकतीच बुलढाणा नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून रुजू झाली होती मात्र रुजू होण्याच्या दिवशीच एमपीएससी निकालात राजपत्रित अधिकारी म्हणून उत्तीर्ण झाल्याचा निकाल तिच्या हाती पडला आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अनेक विद्यार्थी मेहनत घेत असतात शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न ऊराशी बाळगून उदिष्टापासुन जराही विचलीत न होता स्वतःला झोकुन देत असतात असेच काहीसे यश अर्चना राजपूत हिने मिळवले आहे. मागील वर्षी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची लक्ष्मण रेषा पार करत अर्चना आता सहाय्यक आयुक्त बनली आहे. स्वप्नपूर्ती साठी अत्यंत जिद्दी असलेल्या अर्चनाचे वडील एसटी महामंडळात पाचोरा डेपोत वाहक असून सामान्य कुटुंबातील ती मुलगी आहे.मूळची नगरदेवळा येथील असलेल्या अर्चना हीचे शालेय शिक्षण नगरदेवळा येथिल सरदार एस के पवार हायस्कुल येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण अमळनेर येथे प्रताप महाविद्यालयात झाले आहे.बारावी उतीर्ण झाल्यानंतरच अधीकारी होण्याच स्वप्न तिला स्वस्थ बसु देत नव्हते. अविनाश धर्माधिकारी,विश्वास नांगरे पाटील यांना आदर्श ठेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय तिने घेतला दोन वर्षापूर्वी नगरपालिका मुख्याधिकारी पदाला तिने गवसणी घातली होती,मात्र क्लासवन अधिकारी होण्याच ध्येय घेऊन प्रचंड आत्मविश्वासाने पुन्हा ती स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्याने राजपत्रित आधीकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी म्हणून तिची आता पदस्थापना होनार आहे. अर्चनाच्या चमकदार कामगिरीने अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक,सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी जैन व सर्व प्राध्यापक वृंदानी तिचे अभिनंदन केले आहे.

