
अमळनेर:- मोटारसायकल घरी लाव असे सांगितल्याचा राग आल्याने तालुक्यातील कलाली येथे एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील कलाली येथे राहणाऱ्या मच्छिंद्र आधार कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २८ मार्च रोजी गावातील विनोद भगवान भील हा पप्पू पारधी याची गाडी फिरवत होता. त्या गाडीत पेट्रोल कमी असून ती माझ्या घरी लाव असे फिर्यादीने विनोद भील याला सांगितले. मात्र त्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी कड्याने डोक्यावर मारून जखमी केले. मच्छिंद्र कोळी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




