
सिंचन प्रश्नासंदर्भात तसेच निवडणुकीतील भूमिकेबाबत होणार चर्चा…
अमळनेर:- खान्देशातील जलसिंचनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र जल परिषदेकडून ऑनलाईन मीटिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र नागरिकांनी विकासासंदर्भात मोलाची अशी भूमिका अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाची असून त्याबाबतीत जागरूक होणे हि काळाची गरज आहे. खान्देशातील जलसिंचन प्रश्नासंदर्भात लोकांमध्ये जलसाक्षरता होण्यासाठी कटिबध्द कार्यक्रम तसेच जनप्रसार करण्याकरिता एकत्र येणे गरजेचे असून लोकसभेतील प्रतिनिधींची भूमिका हि महत्वाची आणि मोलाची असून लोकसभेमध्ये निवडून जाणारा प्रतिनिधी केंद्रात महत्वाच्या अश्या योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरिता प्रयत्न करणारा आणि लोकसभेमध्ये आपला दमदार असा आवाज उठविणारा उमेदवार असला पाहिजे. बऱ्याच प्रकल्पांना केंद्रीय स्तरावर निधी मिळवून देण्यासाठी तसेच पिढ्यांनपिढ्या पासून प्रलंबित असणारे प्रकल्पास चालना देणारा उमेदवार असावा व त्या अनुषंगाने चर्चा तसेच निवडणुकीतील भूमिकेबाबत ३१ मार्च रोजी सविस्तर चर्चा करण्यासाठी ह्या ऑनलाईन मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे. पाडळसरे निम्न तापी प्रकल्पाबाबत यशस्वी लढा देणारे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी हे या बैठकीत मार्गदर्शन करणार असून मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्या परिसरातील पाणी प्रश्नाविषयी प्रश्न विचारू शकतात, असे आयोजकांनी कळविले आहे. रविवार दिनांक ३१ रोजी संध्याकाळी ८.०० गुगल मिटवर ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात जळगांव, धुळे, नंदुरबार तसेच क.स.मा.दे. भागातील जागरूक, राजकीय व सामाजिक दृष्ट्या सगज व तरुणांनी जास्तीजास्त संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र जल परिषदे तर्फे करण्यात आले आहे.
मीटिंगची लिंक 👇🏻
https://meet.google.com/rzu-fgsj-urj




