अज्ञात चोरट्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथे घराचा कडीकोंडा तोडून सोन्याच्या दागिन्यांसह ८७ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना ३१ रोजी भरदिवसा घडली आहे.
पाडळसरे येथील शेतकरी जुगल राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ३१ मार्च रोजी दिवसा सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० दरम्यान ते घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील लाकडी कपाटीतून ३० हजाराचे सोन्याचे कानातले, ३० हजाराची सोन्याची साखळी, व २७ हजार रुपये रोख असा एकूण ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.