
अमळनेर:- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अमळनेर बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
8 एप्रिल रोजी राज्य परिवहन मंडळाच्या अमळनेर आगार बस स्थानक व परिसर स्वच्छ झाडून कचरा गोळा करण्यात आला. बस स्थानक पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. याप्रसंगी आगारातील सर्व कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतले. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक दिवस अगोदर सदरची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आगार प्रमुख इमरान खान पठाण यांनी सदर स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले व संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.




