
वाजवी भाव, शिस्तीत लिलाव आणि सुविधांमुळे मिळतोय शेतकऱ्यांचा प्रतिसाद…
अमळनेर:- शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी भाव,शिस्तीत लिलाव आणि योग्य सुविधांमुळे काल अमळनेर बाजार समितीत २० हजार क्विंटल मालाची विक्रमी आवक झाल्याची माहिती सचिव डॉ उन्मेष राठोड यांनी दिली.
सकाळी सुमारे साडे पाचशे वाहनांची गर्दी झाली होती. वाहनांना रांगेत उभे करण्यासाठी १५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. कडक उन्हाळा असल्याने वाहने उन्हात उभी होती मात्र सभापती अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांना व वाहन चालकांना जागेवर थंड व शुद्ध पाणी पाजण्यासाठी तीन कर्मचारी नियुक्त केले होते. लिलाव सुरळीत व्हावा व बाहेरील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक समाधान धनगर हे समक्ष लिलावाच्या वेळी थांबून होते.
असे होते बाजारभाव…
गहू ४ हजार क्विंटल कमाल भाव ३०११, बाजरी १५०० क्विंटल कमाल भाव, २४३५ रुपये , दादर ३ हजार क्विंटल कमाल भाव ४२०० रुपये , ज्वारी ३ हजार क्विंटल भाव २४३९ रुपये , मका ६ हजार क्विंटल भाव २१०० रुपये , व्ही टू चना १५०० क्विंटल भाव ८१५५ रुपये, यासह गावठी हरभरा भाव ५९०० रु, गुलाबी हरभरा ८०७१ रु , चापा हरभरा भाव ५७११ रुपये, डॉलर हरभरा १०,००० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला.




