
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील रहिवासी, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम शामराव पाटील यांची जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
ही निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार करण्यात आली असल्याचे काँग्रेस कमिटीचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी नेहमीच काँग्रेस पक्षाची विचारधारा व पक्ष निष्ठा जोपासली. त्यामुळे त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार शिरीष चौधरी, जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार, ऍड. संदीप भैय्या पाटील, सुलोचना वाघ,बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील,बाजार समितीचे संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील, काँग्रेस व्ही. जे. एन. टी.विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष जाधव,बी. के. सूर्यवंशी, गोकुळ पाटील, मनोज पाटील, संदीप घोरपडे,मुन्ना शर्मा, धनगर दला पाटील, मारवड येथील उपसरपंच भिकन पाटील, बन्सीलाल भागवत आदींनी अभिनंदन केले आहे.




