
शोभायात्रेचे विसावे वर्ष असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह…
अमळनेर:- येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हिंदू नववर्ष शोभा यात्रा काढली. शोभा यात्रेचे हे विसावे वर्ष असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
प्रताप मिल कंपाउंडमधील श्रीमंत प्रताप शेठ यांच्या पुतळ्याजवळ हिंदू नववर्ष रॅलीसाठी सर्वजण एकत्र आले होते.सुरुवातीला देशभक्तीपर गीत व आरती होऊन शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आपली झाकी सजवून आणलेली होती. त्यात झाकिंमध्ये पैलाड येथील नागरिकांनी अहिल्याबाई होळकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी,श्रीराम मंदिर प्रतिकृती, चौधरी समाज रथ, नगरपालिका रथ, जळगाव जनता बँक, स्वामीनारायण मंदिर, अमळनेर गोशाळा, अग्रवाल समाज रथ, आसाराम बापू रथ, नवलभाऊ पाटील, सैनिकी शाळा रथ, संत गोरा कुंभार आरस, सुतार समाज आरस, आर्ट ऑफ लिव्हिंग रथ, जळगाव पीपल बँक, अर्बन बँक,हस्ती बँक, संत तुकाराम महाराज झाकी, संत गाडगे बाबा झाकी, जी.एस. हायस्कूल, डी.आर.कन्या शाळा, पी.बी. ए. इंग्लिश मीडियम, सावित्रीबाई फुले शाळा, जय झुलेलाल, मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या वेगवेगळ्या झाकी दिसल्या. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा व राम मंदिर झाकीने सर्वांचे लक्ष वेधले. तरुण-तरुणी, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, प्रतिष्ठित व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला नऊवारी साडी परिधान करून आलेल्या होत्या. महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.घोडे, वेगवेगळ्या झाकी, बँड पथकावर देशभक्ती पर गीत यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी विविध रंगांच्या रांगोळी काढून स्वागत केले. ठिकठिकाणी रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली .नागरिकांनी शोभा यात्रेच्या मार्गावर ठीक ठिकाणी पिण्याचे पाणी व सरबतची व्यवस्था केली होती. शोभायात्रेत सर्वांनी भगवे फेटे बांधलेले दिसले.ओमप्रकाश मुंदडा, डॉ. चंद्रकांत पाटील, बजरंग शेठ अग्रवाल,प्रदीप अग्रवाल, सुभाष चौधरी,प्रा. देवेंद्र तायडे, राकेश शर्मा, दिनेश ठाकरे, योगेश मुंदडा, भैरवी वाघ पलांडे, नीरज अग्रवाल,उमेश वाल्हे, राजाभाऊ खाडिलकर, शितल देशमुख,विकास जोशी, विजय पाटील, कल्पेश पाटील, अभिषेक पाटील, राहुल कंजर, दिलीप ठाकूर,सुरेश पवार,दिनेश पालवे, हितेश शाह, प्रकाश ताडे, विजय पाटील, नाना धनगर, मनोहर महाजन, पवन बारी,डॉ. संजय शहा,प्रा.डी.डी.पाटील, प्रा. एस. आर. चौधरी, आत्माराम चौधरी, बी.एन. पाटील,मनोज भोई, प्रमोद पवार, विजय चव्हाण, पंडित नाईक, देवेंद्र परदेशी, नरेंद्र निकम, पंडित नाना चौधरी, हेमंत सैंदाणे,लालू सैनानी, सुभाष गुरव,दिलीप पाटील, बापू हिंदुजा ,अनिल शिंपी, प्रवीण पाटील, संजय चौधरी, हैबतराव पाटील, प्रा. जे.सी. अग्रवाल,विनोद अग्रवाल, जितू सोनार,प्रभाकर कोळी, संजय कुंभार, त्रिगुण आराध्य उपस्थित होते. शेवटी बजरंग अग्रवाल यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर सामूहिक पसायदान होऊन शोभा यात्रेचा शासकीय विश्रामगृह येथे समारोप करण्यात आला.




