
अमळनेर:- तालुक्यातील भोणे येथील एक अल्पवयीन मुलगी ११ रोजी पहाटे चार वाजता प्रात:विधीला गेल्यानंतर बेपत्ता झाली आहे.
अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




