अमळनेर:- तालुक्यातील मालपुर येथे श्री रेणुका भवानी माता मंदिर लोकवर्गणीतून उभारण्यात आले असून नुकताच प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.
जयपूर येथून संगमरवरी दगडाची सुरेख व देखीव श्री रेणुका देवीची मूर्ती आणण्यात आलेली असून पहिल्या दिवशी संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक व शोभायात्रा वाजत गाजत काढण्यात आली.दुसऱ्या दिवशी डॉ. बी एस पाटील, डॉ. निनाद बी.पाटील, जितेंद्र शिंदे, किशोर पाटील, अरुण पवार, सुभाष पाटील, संभाजी पाटील,या सात सपत्नीक लोकांच्या हातून भक्ती भावाने मूर्ती लोकपाल हवन करून देवतांचे पूजन करण्यात आले. रात्री ह.भ. प. पंकज महाराज एकतासकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात करण्यात आला.
तिसऱ्या दिवशी तिथी प्रतिष्ठा मुहूर्त दु.1:20 मि. प्राणप्रतिष्ठा होऊन महाआरती करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी डॉ.नरेंद्र शांताराम पाटील, सतिलाल पाटील,भूषण सोनवणे,संजय पाटील, राकेश सोनवणे, मिलिंद पाटील,भरत पाटील, समाधान पाटील, पवन पाटील,यासह सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.