बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले बक्षीस…
अमळनेर:- महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाडळसरेत ग्रामपंचायत, सार्वजनिक वाचनालय, मराठी शाळेसह आंबेडकरी अनुयायींनी व वाल्मिक मित्र मंडळ आदी विविध संस्था संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात सायंकाळी भीमरायाची मिरवणूक काढण्यात आली प्रतिमापुजन, व्याख्यान, व मिरवणुकीतून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यात ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शुभांगी पाटील, उपसरपंच शिवाजी पाटील यांनी बाबासाहेबांचा प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी सचिन पाटील व माजी सरपंच रमेश पाटील, संजय पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी उपसरपंच प्रभाकर पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे भुषण पाटील, बापू अहिरे, सागर अहिरे, सागर कोळी ,जयसिंग कोळी, किरण कोळी, गुलाब कोळी, विश्वास कोळी, सुखदेव कोळी आदी उपस्थित होते तर उत्तमराव पाटील सार्वजनिक वाचनालयात व ग्रंथालयात दुपारी चार वाजता अध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील व उपाध्यक्ष भागवत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमापुजन करून मेणबत्त्या लावून माल्यार्पन करित अभिवादन केले. रणछोड पाटील, भूषण गुर्जर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष गोपीचंद पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सचिव मधुकर गुर्जर, विकास सोसायटीचे माजी चेअरमन डिगंबर पाटील, रघुनाथ पाटील, चंद्रशेखर पाटील, लक्ष्मण पाटील, भूषण पाटील, मनोज पाटील, मंगल पाटील,ईश्वर गुर्जर आदी उपस्थित होते.
सायंकाळी जातीय सलोख्यातून भिमरायांची व गौतम बुद्धाची सजवलेली प्रतिमेचे गावात मिरवणूक काढून भिमगीते म्हटली. महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. भिमरायाची आरती होऊन आंबेडकर चौकात समारोपाचा कार्यालयात जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे, ज्ञानेश्वर अहिरे, गयाबाई अहिरे व सार्थक अहिरे यांच्या हस्ते केक कापून उपस्थितांना भरविला. शांतता समितीचे सदस्य वसंतराव पाटील, प्रा. कृष्णा सोनवणे, हेमंत गुर्जर ,दिलीप अहिरे ,माजी सरपंच रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बापू अहिरे, गोकुळ अहिरे यांनी भिमगीत सादर करून जिवन कार्याचा परिचय दिला. सिद्धार्थ अहिरे, धनंजय अहिरे व मोना अहिरे, हिने कविता व बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विपद केले,त्यांना खाऊ ,पुस्तके व शालेय दप्तर माजी सरपंच सचिन पाटील यांनी बक्षीस म्हणून दिलें यावेळी रमण अहिरे, कालु सोनवणे, बापू मिस्तरी, विश्वास कोळी, जयसिंग कोळी, हेमंत पाटील, संतोष अहिरे, रमण कोळी,मणीलाल गुर्जर ,रामसिंग कोळी , राहुल पाटील , समाधान पाटील, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आंबेडकरी अनुयायींनी परिश्रम घेतलेत. भीमगित म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.