प्रताप कॉलेजजवळील घटना, तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- तरुणीचा पाठलाग करून जबरदस्तीने प्रेम करण्यासाठी एका तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ रोजी सकाळी १० वाजता प्रताप कॉलेजजवळ घडली.
तालुक्यातील रुंधाटी येथील एक तरुणी सकाळी ८ वाजता गावावरून प्रताप कॉलेजला येण्यासाठी बसमध्ये बसली असता गंगापुरी येथील वीरेंद्र राजेंद्र पाटील हा देखील बसमध्ये होता. अमळनेर येथे उतरल्यावर त्याने प्रताप कॉलेजपर्यंत पायी तरुणीचा पाठलाग केला. तेथे त्याने तू माझ्याशी प्रेम कर आणि दुपारी साडेचार वाजता मला भेट नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तरुणीने घाबरून आपल्या पालकांना अमळनेर बोलावून पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर वीरेंद्र विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.