बसस्थानकावरील वादाप्रकरणी दुसऱ्या गटातर्फे पोलिसांत फिर्याद…
अमळनेर:- बसस्थानक वरील १४ रोजीच्या घटनेत दुसऱ्या गटातर्फे अवधान (ता. धुळे) येथील महिलेच्या तक्रारीवरून एस टी चालक आणि वाहकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवधान येथील २२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली की, १४ रोजी अमळनेर बसस्थानकावर बस लागल्यावर बस चालक समाधान भगवान लांडगे याला बस कुठे जाते असे विचारल्यावर त्याने अश्लील भाषेत उत्तर दिले. त्यावर तिचे पती बोलायला गेले असता समाधान लांडगे व वाहक दर्शन सोमवंशी यांनी महिलेचा विनयभंग केला व पतीला मारहाण केली. अमळनेर पोलीस स्टेशनला चालक व वाहकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.