
अमळनेर :- शहरातील भगवा चौकात सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील दि.२८ एप्रिल पासून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दि. ५ मे रोजी सप्ताहाची समाप्ती होणार आहे.

शहरातील भगवा चौकात गेल्या चार वर्षांपासून कीर्तन सप्ताह आयोजनाची अखंड परंपरा सुरू आहे.ह्या वर्षी देखील दि.२८ एप्रिल रोजी हभप कंचनाताई जगताप नाशिक यांच्या किर्तनाने सुरुवात होणार असून दि.२९ रोजी हभप भाऊराव महाराज मुक्ताईनगर,दि.३० हभप पांडुरंग महाराज आवारकर,दि १ मे रोजी हभप गजानन महाराज वरसाडेकर, दि २ रोजी हभप वासुदेव महाराज रावळगांवकर, दि ३ रोजी हभप युवराज महाराज दोंडाईचा, दि ४ रोजी हभप जीवराम महाराज कापडणे,दि.५ रोजी हभप योगीदत्तनाथ महाराज गोरक्षनाथ आखाडा शिंदखेडा यांच्या काल्याच्या किर्तनाने समारोप होणार आहे.रोज सकाळी ६ वाजता काकडा आरती, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व रात्री ८ वाजता कीर्तन होणार असून भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन भगवा चौक मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.




