
अमळनेर :- “मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, लढा मलेरिया हरवण्यासाठी” या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात करून पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर जागतिक जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात आला.

हिवताप रोगाविषयी जनजागृती व उपाय योजना हिवतापाचे निर्मूलन करण्याबाबत जनसामान्याच्या मनात रुजवून गावागावांमध्ये हिवताप बाबत जनजागृती करत हस्त पत्रिका वाटप करण्यात आल्या. कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले तसेच आजारी तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले व डास उत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. तसेच बस स्थानक व रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या प्रवाशांना हिवतापाविषयी जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बाहेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाभळे, तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत फुगे, आरोग्य पर्यवेक्षक यांनी तालुकास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी हिवतापासंदर्भात मार्गदर्शन व उपाय योजना करण्यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.




