
अमळनेर:- शहरातील बन्सीलाल पॅलेसमधून एक मानसिक रुग्ण बेपत्ता झाल्याची घटना २ रोजी दुपारी घडली.

शशिकांत नामदेव वाघ (वय ४१ रा मानपाडा रोड डोंबिवली) हा आपल्या कुटुंबियांसोबत अमळनेर येथे बन्सीलाल पॅलेस मध्ये लग्नाला आला होता. जेवण करून येतो असे सांगून तो निघून गेला आणि गायब झाला. तो मानसिक रुग्ण असल्याचे त्याच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.




