५४ ग्रॅम सोन्याचा ऐवज लंपास, अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- इगतपुरी चोपडा बसमधून दोन महिलांच्या हातातील ५४ ग्रॅम वजनाच्या सुमारे सोन्याच्या दोन पाटल्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
चोपडा तालुक्यातील वर्डी येथील भारती राजेंद्र धनगर व तिची दिराणी भारती दीपक धनगर या २ रोजी इगतपुरी चोपडा बसमधून जात असताना कंडक्टर तिकिटाचा तपास करत असताना तिला लक्षात आले की, हातातील २४ ग्रॅमची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. महिला घरी निघून गेली. नंतर महिला अमळनेर बसस्टँड वर चौकशी करायला आली असता लासुर ता. चोपडा येथील महिला पुष्पा अरुण देसले हिच्या हातातील ३० ग्रॅमची सोन्याची पाटली देखील चोरीस गेली असल्याचे सांगितले. भारती धनगर हिने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.