
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारवड पोलिस व केरळ आर्म पोलिसांनी रूट मार्च काढला.

मारवड पोलीस ठाणे हद्दीतील मांडळ हे संवेदनशील म्हणून ओळखले जात असून रविवार ५ मे रोजी गावात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मारवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, मारवड पोलिस ठाण्यातील ४ कर्मचारी तसेच केरळ आर्म पोलीसचे अधिकारी, अंमलदार तसेच ३५ कर्मचारी यांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला.




