
अमळनेर:- विमा काढायला दिलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याने एकाला न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि दीड लाखाचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

राजुसिंग बाबूसिंग परदेशी यांनी २०१४ मध्ये मोहन महादेव वाडकर याना विमा काढण्यासाठी ९० हजार रुपये दिले होते. मात्र विमाही काढत नसल्याने परदेशी यांनी पैसे परत मागितले असता वाडकर याने धनादेश दिला होता. हा धनादेश न वटल्याने परदेशी यांनी न्यायालयात १३८ प्रमाणे खटला दाखल केला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. निलेश यलमाने यांच्यासमोर हा खटला सुरू होता. परदेशी यांच्यातर्फे ऍड एस आर पाटील यांनी बाजू मांडली. आरोपी मोहन वाडकर याला सहा महिन्यांची साधी कैद तसेच रकमेचे ९० हजार व दंड ६१ हजार २०० असा एकूण एक लाख ५१ हजार रुपये एका महिन्याच्या आत परदेशी याना द्यावेत. मुदतीच्या आत दंडाची रक्कम न दिल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.




