
अमळनेर:- आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेतून मतदानाचे आवाहन करत मुस्लिम समाजबांधवांने राबवलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आहे.

आवास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशपाक बशिरोद्दीन शेख यांची मुलगी सना परवीन हीचा विवाह ८ मे रोजी शिरपूर येथील शोहेब शेख याच्याशी संपन्न होत आहे. राष्ट्रीय कर्तव्य समजून अशपाक शेख यांनी मुलीची लग्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला ‛देश के विकास मे दे अपना योगदान…हर हालमे करना अपना मतदान … मतदान जनजागृती अभियान ’ असे छापून प्रत्येकाला मतदानाचे आवाहन केले आहे. अशपाक शेख यांच्या या कार्याचे प्रशासनाने देखील कौतुक केले आहे.




