
अमळनेर:- येथील सर्व सामाजिक संघटनांतर्फे ८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता सानेगुरुजी विद्या मंदिराच्या प्रांगणात मुक्त पत्रकार निखिल वागळे, कायदेतज्ज्ञ ऍड असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर सरोदे यांची निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठीचा लढा समजून घेण्यासाठी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आले आहे. या सभेला सामाजिक स्वरूप देण्यात आले असले तरी लोकसभेच्या निवडणूक काळात ही सभा होत असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या सभेकडे लागून आहे.




