
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथील श्याम हिरकण भिल (वय ४८) याचा शेतात काम करताना उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समजते.
श्याम भिल हा सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात गेला होता. सायंकाळ पर्यंत तो घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेतला असता तो शेतात पडलेला आढळून आला. त्याच्या शरीराची त्वचा भाजलेली दिसून आली व त्वचेचे तुकडे निघत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.





