
अमळनेर:- येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पी. सी. भांडारकर व स्व. प्रा.र. का. केले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निमित्ताने स्वीप उपक्रमा अंतर्गत जनमानसात मतदान जागृती होणेसाठी व नवमतदारांचा या प्रक्रीयेत सहभाग होण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या आवाहनास प्रतिसाद देत “तारीख तेरा मतदान मेरा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

खा. शि. मंडळाचे सहचिटणीस प्रा.डॉ. धिरज वैष्णव, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार शिस्तबध्दपणे वर्तुळाकार पध्दतीने उभे राहून “तारीख तेरा मतदान मेरा” च्या घोषणा देत मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेतली.
खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, फार्मसी विभागाचे चेअरमन योगेश मुंदडे, खा.शि. मंडळाचे चिटणीस तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र स. सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे अभिनंदन केले आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रताप महाविद्यालयातील प्रा. डॉ. हेमंत पवार यांनी केले तर आभार फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापिका रोशनी भावसार यांनी मानले.

