अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी मारवड पोलिसांत केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चौबारी येथील १९ वर्षीय तरुणी दिनांक १६ रोजी पहाटे पाच वाजता घरात दिसून न आल्याने आईवडिलांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे विचारपूस केली असता काहीच तपास न लागल्याने तिच्या वडिलांनी मारवड पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.