४.६५ लाखांची वसुली, २० कनेक्शन कट करत ५ पंप केले जप्त…
अमळनेर:- येथील नगरपरिषदेकडून मालमत्ताकर व पाणीपट्टी थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्यात येत असून ४.६५ लाखांची वसुली करण्यात आली आहे.
सन- २०२३-२४ अखेर मालमत्ताकर व पाणीपट्टी कर थकबाकीदारांवर वसुलीसाठी कडक कारवाई करण्यात येत असून त्यात जवळपास २० नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे. पाच पाण्याचे पंप जप्त करण्यात आली असून २ व्यापारी दुकानांना सिल करण्यात आलेले आहे.तसेच ४,६५००० रोख रक्कम रुपये वसुल करण्यात आली. मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, कर अधिकारी रवींद्र चव्हाण, फिल्टर निरीक्षक गणेश शिंगारे, कृष्णा जाधव, फिरोज पठाण, सोमचंद संदानशिव, प्रसाद शर्मा, शेखर देशमुख, साजिद शेख, सतीष बडगुजर, जगदीश चौधरी, प्रवीण शेलकर, तसेच इतर वसुली कर्मचाऱ्यान मार्फत मोहीम राबविण्यात येत आहे. तरी मालमत्ताकर व पाणीपट्टीकर थकबाकीदारांनी नगरपरिषद कडे त्वरित भरणा करून जप्तीची व नळ संयोजन बंद करण्याची कार्यवाही बंद करावी असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे.