
इयत्ता बारावीचा ९८.८५ टक्के लागला निकाल…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै.भालेराव रामभाऊ पाटील सायन्स ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून शाळेचा ९८.८५ टक्के निकाल लागला आहे.

यात प्रथम क्रमांक समृद्धी सुनील अहिरे 83.67%, द्वितीय क्रमांक प्राजक्ता राजकुमार जगदेश 83.50%, व लोकेश संदीप पाटील 83.50%, तृतीय क्रमांक प्रथमेश भोळेश्वर पाटील 83.17% यांनी मिळवला आहे तर चतुर्थ क्रमांक सलोनी भूपेश पाटील 82.17% पाचवा क्रमांक
आदित्य रमेश पाटील 81.83% यांनी पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भिकनराव भालेराव पाटील,शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.




