बेरोजगारांना रोजगार उपलब्ध देणार, रुग्णवाहिकेचे करणार लोकार्पण…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथील मूळ रहिवासी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजराथ एटीएस मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या अमळनेर येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते २७ रोजी सकाळी १०.४८ वाजता संपन्न होत आहे.
प्रकाशभाई पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर अमळनेर तालुक्यात विविध लोकोपयोगी कामे करण्यासाठी आपले उर्वरित आयुष्य सार्थकी लावण्याचे ठरवले आहे. त्यासाठी रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका व तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. त्यासाठी जनतेचा संपर्क व्हावा यासाठी त्यांचे संपर्क कार्यालय सुरू झाले आहे. जनतेच्या सेवेसाठी २४ तास त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
असा होईल उद्घाटन सोहळा –
सकाळी ७.३० वाजता झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिरावर केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांचे आगमन व होमहवन कार्यक्रम, हॉटेल मिडटाऊन येथून सकाळी १० वाजेपासून बग्गीवर केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांचा मिरवणूक कार्यक्रम, ही मिरवणूक हॉटेल ते सुभाष चौक, ते स्टेशन रोडवरून, तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ होईल व महाराणा प्रताप चौकात आगमन त्यानंतर धुळे रस्त्यावरील शिवांश बिझिनेस हब येथे कार्यालय स्थळी आगमन त्यानंतर १०.४८ वाजता जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचे देखील लोकार्पण महाराजांच्या हस्ते होईल. यासाठी तालुक्यातील नागरिकांनी अगत्याने येण्याचे आवाहन प्रकाशभाई आर पाटील यांनी केले आहे.