
रत्नप्रवाह प्रवचनमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले विवेचन…
अमळनेर:- सुखी होण्यासाठी समाजात माणसं धावत आहे आम्ही साधू पण सुखी होण्यासाठी साधू बनले आहोत,कोणाची चूक आहे? कोण सुखी आहे?कोण दुःखी आहे? पुरुषार्थ तुम्ही पण करतात पुरुषार्थ मी पण करतो,सुखी जीवन जगण्यासाठी खालील पाच गोष्टींचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रेम, पवित्रता,पीडा प्रामाणिकता, परमात्मा असे विवेचन प्रवचनकार रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी अमळनेर येथे रत्नप्रवाह प्रवचनमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले.
याप्रसंगी अमळनेरच्या कुलदीपिका प्रवचनप्रभावी का पूज्य साध्वी श्री संवेगनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या. प्रेम- जीवनात सौंदर्य, संपत्ती,सत्तेपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे आपल्याकडे असा एक पत्ता आहे का की आपण मनापासून तेथे रडू शकतो, काही लोक सर्वांवर प्रेम करतात परमात्मा सर्वांवर प्रेम करतो. पवित्रता- मी पवित्रताच्या रस्त्याने चालेल अंतर्मनाच्या विरुद्ध मी चालू शकत नाही मला वाचविणारे अंतर्मनच आहे. एखादी वाईट गोष्ट करताना तुझ्या अंतर्मनाचा विचार व निर्णय घे. पिडा-बिना त्रास बिना दुःख, पीडा याशिवाय आपले जीवन नाही. पिडेवर प्रेम करा, सुख चांगले नाही दुःख चूकत नाही, मडक्याला आगीत भाजल्याशिवाय ते तयार होत नाही जीवनात बिफोर टाईम दुःख आले तर माणूस मजबूत होऊ शकतो परंतु जीवनात बिफोर टाईम सुख आले तर मुलगा सैतान होऊ शकतो. प्रामाणिकता- आपल्या परिवाराशी आपण प्रामाणिक रहा घरातील कोणाशीही खोटं बोलू नका सर्वांचा विश्वास संपादन करा.सध्या सर्वांबरोबर चीटिंग सुरू आहे प्रत्येक नात्याला प्रामाणिक बनवा खोटे कधीच शिखरापर्यंत जात नाही. परमात्मा- परमेश्वराला आम्ही पाहिले नाही परंतु परमेश्वर सर्वांना प्रेम करतात, ऑक्सिजनला आपण पाहिले नाही पण ऑक्सिजन आहे, इज्जत बुद्धीला आपण पाहिले नाही पण इज्जत बुद्धी आहे. माझा यशाच्या उंच शिखरावर मला परमेश्वर दिसले पाहिजे. वरील पाच गोष्टींचे आचरण आपण जीवनात जर केले तर सुखी जीवन जगणे सर्वांना शक्य आहे असे आग्रही प्रतिपादन प्रवचनकार रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांनी केले. याप्रसंगी स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये मिडटाउन येथे उपस्थित होते.




