अमळनेर:- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त येथील बस स्टँड चौकातील स्मारक स्थळी अनेकांनी एकत्रित येत माल्यार्पण व पूजन करून अभिवादन केले.
जयंतीच्या निमित्ताने सकाळपासूनच शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधवांसह लोकप्रतिनिधीनी गर्दी केली होती.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी माजी नगराध्यक्ष जयश्री अनिल पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, संचालक भोजमल पाटील,समाधान धनगर, विजय पाटील,प्रकाश अमृतकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्यासह उपस्थिती देत धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत पूजन व अभिवादन केले.तसेच माजी आमदार स्मिता उदय वाघ यांनी देखील शितल देशमुख,देवा लांडगे,अनिल वाणी, ज्ञानेश्वर गंगाराम पाटील,राकेश पाटील व कार्यकर्त्यांसह येत अभिवादन केले.
तसेच धनगर समाज बांधवांच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले.यावेळी अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, मच्छिंद्र लांडगे, बन्सीलाल भागवत, हरचंद लांडगे,रमेश देव, पंडित लांडगे,दशरथ लांडगे, सुधाकर पवार,नितीन निळे, ज्ञानेश्वर धनगर,समाधान धनगर, डी ए धनगर,आलेश धनगर, दादाभाई धनगर,एस सी तेले, हिरामण कंखरे,युवराज धनगर, निलेश लांडगे,दिनेश धामोडे, दशरथ लांडगे,रोहित तेले, सचिन शिरसाठ, आढावे, गोपाल हाडपे, प्रा गजाजन धनगर, प्रदीप रावण कंखरे,प्रदीप हिरामण कंखरे यासह समाजबांधव उपस्थित होते.