तालुक्यातील खर्दे येथील घटना, सात जणांविरुद्ध ऍट्रोसिटी दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील खर्दे येथे मुलीचे नाव घेतल्याच्या संशयावरून एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध ऍट्रोसिटीसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मारवड पोलिसांत दीपक फुलसिंग सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार ३ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गावातील संभाजी अण्णा पाटील, हनुमंत गंगाराम पाटील, संदीप हनुमंत पाटील, चंद्रशेखर हनुमंत पाटील, बाळू शांताराम पाटील, नगराज गरबड पाटील, व दीपक नगराज पाटील यांनी दीपक याच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून फिर्यादीचा भाऊ रवींद्र फुलसिंग सोनवणे याची मोटारसायकल रस्त्यावर अडवून त्याची गच्ची धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत राहत्या घरापर्यंत नेत फिर्यादीच्या नातेवाईक व बाया माणसांना शिवीगाळ करत गावात राहणे मुश्किल करू असे सांगत धमकी देवून निघून गेले. त्यामुळे फिर्यादीचा भाऊ रवींद्र याने राहत्या घरी रुमालाने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मारवड पोलिसांत भादवि कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ व अनु. जाती जमाती अत्याचार अधिनियमाचे कलम ३(१)र, व ३(१) एस अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.