
चिखलाने परिसरातील नागरिकांचे होताय हाल…
अमळनेर:- येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ते तांबेपूरा ह्या रस्त्याचे काम ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात सुरू केल्यामूळे संपूर्ण रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

ह्या रस्त्यावर मोटारसायकल चालविणे जिकरीचे झालेले असून पायी चालणाऱ्या लोकांना ही चिखलातूनच जावे लागत आहे. सदर रस्ता हा रहदारीचा असूनसुद्धा ठेकेदाराने उन्हाळ्यात काम सुरू केले नाही. चिखलामूळे मोटारसायकल स्लीप होवून किरकोळ अपघात होत आहे. तरी संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.
तांबेपूरा ते अंतूर्लि रस्त्यावर सुद्धा पावसामूळे खड्यात पाणी साचलेले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे लोकप्रतिनिधींनी ह्याकडे काळजीपूर्वक लक्ष देवून रस्त्याचे काम करावे अशी मागणी अंतूर्ली खापरखेडा, रंजाणे, नंदगाव येथील ग्रामस्थांनी केलेली आहे.




