
अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी तसेच शेतीसाठी सिंचन करुन जमीनीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी कामगार आयुक्त विजय निंबा चौधरी यांनी स्वखर्चाने माळण नदीचे खोलीकरण केले होते. या कामामुळे पहिल्याच पावसात मोठा जलसाठा तयार झाला आहे.

पाण्याचा प्रश्न बिकट असल्याकारणाने टँकर मुक्त गाव कसं होईल व काय उपाययोजना करावा लागतील याबाबत त्यांनी माहिती घेत काही मदत लागल्यास केव्हाही गावासाठी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यांनी माळण नदीचे स्वखर्चाने खोलीकरण करण्यात आले व पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गुरढोरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा काही प्रमाणात का असेना पण सुटल्यासारखा आहे. लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील, पुरुषोत्तम चौधरी यांच्या सहकार्याने नदी खोलीकरणाचे काम कामगार आयुक्त विजय निंबा चौधरी यांच्या अनमोल सहकार्याने केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.




