अमळनेर:- तालुक्यातील अंतूर्ली येथील ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ११ रोजी घडली आहे.
विश्वास दत्तू पाटील (वय ६५) असे मयताचे नाव असून ११ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास सदरची घटना उघडकीस आली. अंतूर्ली येथल राहत्या घरी पुढील रूममध्ये छताच्या कडीला दोराच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील लोकांनी त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.