अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे येथे शेतकरी यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन २०२४-२५ अंतर्गत उडीद या पिकाचे दहा हेक्टर साठी बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात शेती शाळा अंतर्गत शेतकरी निवड, बीजप्रक्रिया, माती नमुने काढणे, खत व्यवस्थापन याविषयी कृषी सहाय्यक पूनम पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदरचा प्रकल्प राबवण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी आर एन सोनवणे व कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांचे सहकार्य लाभले तसेच तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत साठे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.